मुंबई-दिल्ली एक्सप्रेसवेवर कारला भीषण अपघात, चौघांचा जागीच मृत्यू, 5 जण गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई-दिल्ली एक्सप्रेसवेवर शुक्रवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. या अपघातात तीन महिलांसह चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे सर्व जण एकाच कुटुंबातील आहेत. हे कुटुंब झाबूआहून खाटू श्याम दर्शनासाठी निघाले होते.

कारवरचे नियंत्रण सुटल्याने कार उलटली आणि ट्रकला धडकली. हा अपघात मध्य प्रदेशातील रतलाम येथे घडला. कार चालकाने ट्रकला ओव्हरटेक करायचा प्रयत्न केला. अपघातातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खाटू श्यामच्या दर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला. जखमींमध्ये एका दहा वर्षाच्या चिमुकल्याचाही समावेश आहे.