
अभिनेत्री राणी मुखर्जीला ऑस्ट्रेलियाच्या ला ट्रोब युनिव्हर्सिटीने ‘डॉक्टर ऑफ लेटर्स’ म्हणजेच डी.लिट या मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित केले आहे. मेलबर्नमधील फेडरेशन स्क्वेअर येथे इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये डी.लिट देऊन राणीचा सन्मान करण्यात आला. शाहरुख खाननंतर हा सन्मान मिळवणारी राणी मुखर्जी दुसरी हिंदुस्थानी ठरली आहे.






















































