
हिंदुस्थानच्या पुरुष हॉकी संघाने Hockey World Cup 2026 ची दणक्यात सुरुवात केली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच टीम इंडियाच्या खेळाडूंनी देशवासीयांच्या आनंदात मोलाची भर घातली. नेदरलँडच्या अम्स्टेलवीन येथील वॅग्नर हॉकी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात हिंदुस्थानने वेल्सचा 3-1 अशा फरकाने पराभव केला.
सामन्याच्या पहिल्याच क्वार्टरमध्ये टीम इंडियाने जोरदार आक्रमक खेळ करत पेनल्टी कॉर्नरवर दोन गोलची आघाडी घेतली. पहिल्यांदा 25 वर्षीय संजय राणाने 8 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर गोलमध्ये करत संघाचे खाते उघडले. त्यानंतर, 11 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर कर्णधार हरमनप्रीत सिंहने गोलकीपरला चकवत शानदार ड्रैग-फ्लिकच्या मदतीने टीम इंडियाची आघाडी 2-0 केली. पहिल्या हाफपर्यंत हिंदुस्थानकडे हीच मजबूत आघाडी कायम होती.
India beat Wales 3-1 in their opening Pool D game of the FIH World Cup 2026 in Amstelveen
Swipe through the match-day moments from India’s winning start. 📸🔥#HockeyIndia #IndiaKaGame #HWC2026 #INDvsWAL pic.twitter.com/AwBdOHHogL
— Hockey India (@TheHockeyIndia) August 15, 2026
तिसऱ्या क्वार्टरमध्ये 42 व्या मिनिटाला हिंदुस्थानला पुन्हा पेनल्टी कॉर्नर मिळाला, ज्याचा फायदा घेत कर्णधार हरमनप्रीत सिंहने गोलकीपरच्या डाव्या बाजूला ड्रैग-फ्लिक करत संघाचा तिसरा आणि स्वतःचा दुसरा गोल केला. हा हरमनप्रीतचा विश्वचषकातील 8 वा गोल ठरला. यानंतर सामन्याच्या 55 व्या मिनिटाला वेल्सच्या सॅम वेल्शने गोल करून संघाचे खाते उघडले, परंतु तोपर्यंत हिंदुस्थानने विजयासाठी सुरक्षित आघाडी घेतली होती. टीम इंडियाचा पुढील सामना 17 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:30 वाजता इंग्लंडविरुद्ध होणार आहे.




























































