
जम्मू-कश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील दच्छन भागात स्कॉर्पिओ कार चिनाब नदीत कोसळली. अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली. हरियाणा पासिंग असलेली ही गाडी दांगदारू ते सौंदर दरम्यान प्रवास करत असताना, सकाळी 10.50 च्या सुमारास दांगदारू येथील येनवानजवळ हा अपघात झाला.
इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, हरियाणा पासिंगची महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी चालकाचे नियंत्रण सुटल्याने नदीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. स्थानिक नागरिक आणि इतर स्वयंसेवकांच्या मदतीने दच्छन पोलिसांनी घटनास्थळी बचावकार्य सुरू केले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.





























































