
तुमच्या स्मार्टफोनचे स्टोरेज फुल होत आहे का? डाउनलोड केलेले मॅप, ‘टाइमलाइन’ माहिती आणि ‘कॅश्ड मॅप डेटा’ मुळे गूगल मॅप फोनमधील अधिकचे स्टोरेज वापरत असते.
डेटा कमी करण्यासाठी, गूगल मॅप उघडा, तुमचे प्रोफाइल पिक्चर आणि ऑफलाइन मॅपवर टॅप करा आणि डिव्हाइसवर सेव्ह केलेल्या शहरांचे अनावश्यक मॅप डिलिट करा.
तुमच्याकडे अनेक वर्षांची लोकेशन हिस्ट्री असेल, तर टाइमलाइन तपासा, आवश्यकता नसल्यास डिलीट करा. टाइमलाइन सेव्ह करायची असेल, तर आधी तिचा बॅकअप घ्या.
इतर कोणत्याही अँड्रोईड अॅपची कॅशे (cache) क्लिअर करता तशीच, ‘सेटिंग्ज’ अॅपचा वापर करून गूगल मॅप्सची पॅशे क्लिअर करू शकता.
सेटिंग्ज अॅप सुरू करा, अॅप्स, सी ऑल अॅप्सवर टॅप करा, स्क्रोल करून मॅप्सवर टॅप करा. अॅप माहिताचे पेज, स्टोरेज आणि पॅशेवर टॅप करा, पॅशे क्लिअर करा वर टॅप करा.





























































