
इंडोनेशियातील सिक्का भागात आज सकाळी भूपंपाचे जोरदार धक्के बसले. भूकंपाची तीव्रता 7.7 रिश्टर स्केल इतकी होती. आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. भूकंपाच्या धक्क्याने अनेक इमारती कोसळल्या. भूकंपानंतर या भागात अनेक ‘आफ्टर शॉक्स’ (भूकंपानंतरचे धक्के) नोंदवले गेले, ज्यामध्ये 5.9, 5.6 आणि 6.1 तीव्रतेच्या धक्क्यांचा समावेश होता.






















































