
झिम्बाब्वेमधील करिबा सरोवरात फेरी उलटल्याने 18 मुलांसह 70 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी होते. जोरदार लाटांमुळे ही फेरी उलटली. अपघातातील मृतांचा आकडा 72 झाला आहे. करिबा शहरातून देशाच्या वायव्येकडील ग्रामीण आणि मच्छीमार समुदायांकडे ही जुनी फेरी जात होती.
इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, उलटलेली बोट एका सरकारी संस्थेद्वारे चालवली जात होती. करिबा सरोवराच्या आसपासच्या ग्रामीण भागातून किनाऱ्यावरील करिबा शहरात लोकांना नेण्यासाठी या बोटीचा उपयोग केला जातो. फेरीची क्षमता 90 प्रवाशांची असताना 153 प्रवासी बोटीतून प्रवास करत होते. पोलिसांच्या माहितीनुसार, मृतांपैकी 16 जण 10 वर्षे आणि त्याहून कमी वयाचे होते.


























































