
ऑर्डर उशिरा पोहोचल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून डिलिव्हरी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी 34 वर्षीय व्यक्तीलाअटक केली आहे. यमन असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
ही घटना शुक्रवारी मेरठमधील गंगा सागर कॉलनी परिसरात घडली. हा परिसर भवनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिलिव्हरी बॉय अमित ऑर्डर पोहोचवण्यासाठी गेला होता. ऑर्डर पोहोचण्यास उशीर झाल्याने अमित आणि यमन यांच्यात वाद झाला.
वाद वाढल्यानंतर यमन याने अमित याला मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर अमित याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी यमनविरोधात एफआयआर दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी शनिवारी यमन याला अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
यूपी : मेरठ की गंगा हाइट्स सोसाइटी में फ्लैट मालिक ने डिलीवरी बॉय को अंदर बंद करके पीटा। डिलीवरी बॉय करीब 3 मिनट बाद फ्लैट से बाहर निकला।
This video is circulating on social media wit above text. @meerutpolice please verify video and take action. #DeliveryBoy #MeerutPolice pic.twitter.com/JuHwoCtsJG
— Shahe Alam (@iAlam75) August 15, 2026


























































