
आयपीएल 2023 च्या 66 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (RR) पंजाब किंग्जचा (PBKS) 4 गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह राजस्थान रॉयल्स संघ प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहिला आहे. तर आयपीएल 2023 मधील पंजाब किंग्सचा प्रवास मात्र संपला आहे. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने 20 षटकांत 5 गडी गमावून 187 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानने दोन चेंडू शिल्लक असताना हा सामना जिंकला.




























































