राष्ट्रगीतावेळी इराणींचे मौन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराणमध्ये सध्या हिजाबविरोधातील आंदोलन भडकले आहे. याचा काळात कतारमध्ये होत असलेल्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत सहभागी इराणी फुटबॉलपटूंनी कठोर इस्लामी ड्रेसकोडला आगळय़ा पद्धतीने विरोध दर्शवला. इंग्लंडचे फुटबॉलपटू मोठय़ा अभिमानाने आपल्या देशाचे राष्ट्रगीत म्हणत असताना इराणी खेळाडूंनी मात्र देशाचे राष्ट्रगीत वाजवले जात असताना मौन धारण केले होते. आपल्या देशातील धार्मिक ड्रेसकोडच्या नियमाचा निषेध त्यांनी राष्ट्रगीत न म्हणता दर्शवला. इराणी सरकार धार्मिक ड्रेसकोडविरोधातील आंदोलन दडपताना दिसत आहे. त्यासाठी होणाऱया पोलिसी कारवाईत शेकडो आंदोलकांचा मृत्यू झाला असून हजारो आंदोलकांना अटक झाली आहे. या कारवाईचा निषेध विश्वचषक लढतीला उपस्थित इराणी नागरिकांनी केला.