फुग्यातील हेलियम वायू नाकात गेल्याने वाढदिवशीच चिमुरड्याचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वत:च्या वाढदिवसासाठी सजावटीसाठी लावलेल्या एका फुग्यातील हेलियम वायू नाकात गेल्याने ज्याचा वाढदिवस होता त्या मुलाचाच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ल्युक रामोन हार्पर असे त्या मुलाचे नाव असून तो आठ वर्षांचा होता. आर्यलँडमधील ड्युब्लिन येथे हा प्रकार घडला आहे.

ल्यूकच्या वाढदिवसासाठी 8 अंकाच्या आकाराचा एक हेलियमचा फुगा आणला होता. वाढदिवस साजरा झाल्यानंतर ल्यूक तो फुगा घेऊन त्याच्या बेडरुममध्ये गेला. त्यानंतर जेव्हा ल्यूकच्या आईने त्याला जेवायला बोलावले तेव्हा तो खाली आलाच नाही. त्यामुळे आईने त्याच्या बहिणीला बोलवायला पाठवले. मात्र ल्यूक खाली पडलेल्या अवस्थेत तिला दिसला. तिने तत्काळ आईला बोलावले.

ल्यूकला त्याच्या आईने उचलून गार्डनमध्ये आणले. त्यानंतर तत्काळ त्याला रुग्णालयात नेण्यात आले. तिथे सुरुवातीला डॉक्टरांनी त्याला हृदयविकाराचा झटका आल्याची शक्यता नोंदवली. मात्र नंतर काही तपासण्याअंती ल्यूकचा मेंदू डॅमेज झाल्याचे दिसून आले. तेव्हा डॉक्टरांनी ल्यूक कशासोबत खेळत होता ते विचारले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की फुग्यातील हेलियम वायू ल्यूकच्या नाकात गेला. त्यामुळे त्याचा मेंदू डॅमेज झाला. त्यानंतर काही दिवस व्हेंटिलेटरवर ठेवून त्याच्यावर उपचार करण्यात आले. मात्र त्यानंतर डॉक्टरांनी ल्यूक उपचाराला प्रतिसाद देत नसल्याचे सांगितले व त्याचा व्हेंटिलेटर काढण्यात आला.