विमानात महिलेचा गोंधळ! क्रू मेंबर्संना मारले, तोंडावर थुंकली आणि नंतर विवस्त्र झाली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विमानात महिलेवर लघुशंका करण्याचे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एका विमानातील प्रकरण समोर आले आहे. यावेळी एअर विस्ताराच्या अबू धाबी येथून मुंबईला येत असलेल्या एका विमानात हाय वोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आहे. इटलीटच्या एका महिलेने विमानात गोंधळ घालत क्रू मेंबर्सना शिवीगाळ आणि मारहाण केली आहे. एवढेच नाही तर एका क्रू मेंबर्सच्या तोंडावर ही महिला थुंकली आहे आणि क्रू मेंबर्स जमा झाल्यानंतर महिला विवस्त्रपणे कॉरिडोअरमध्ये चालायला लागली. याप्रकरणी महिलेला अटक करण्यात आली आहे.

पाओला पेरुशियो (45) असे त्या महिलेचे नाव असून ती इटलीची रहिवासी आहे. महिला इकोनॉमी क्लासचे तिकीट घेऊन बिझनेस क्लासमध्ये बसण्याचा हट्ट करु लागली. त्यावेळी केबिन क्रूने त्या महिलेला रोखण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तिने हंगामा करायला सुरुवात केली. क्रू मेंबर्सना मारहाण केली. याप्रकरणी महिलेला अटक केली आहे.

सहार ठाण्याचे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी एअर विस्तारा विमान यूके 256 के केबिन क्रू ने एक तक्रार केली होती. तक्रारीनुसार विमान रात्री 2.03 वाजता अबू धाबी वरुन निघाले होते. त्यांनी सांगितले होते की, रात्री साधारण अडीजच्या सुमारास इकोनॉमी क्लासमध्ये बसलेली एक महिला अचानक उठून बिझनेस क्लासमध्ये येऊन बसली. विमानाच्या दोन क्रू मेंबर्संनी त्याबाबत तिला विचारले. ज्यावेळी त्यांनाा कळले की महिलेला कोणताही त्रास नाही ती उगाच येऊन बसली. त्यावेळी क्रू मेंबर्सनी त्यांच्याजागी जाऊन त्यांना बसायला सांगितले.

मात्र असे त्यांनी सांगितल्यावर महिलेने त्यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. ज्यावेळी क्रू मेंबर्सपैकी एकाने शिवीगाळ करु नका असे सांगितले त्यावेळी महिलेने एका क्रू मेंबरच्या चेहऱ्यावर मुक्का मारला. त्यानंतर एकाच्या तोंडावर थुंकली. मात्र बाकीचे क्रू मेंबर्स तिथे गोळा झाले त्यावेळी महिला विवस्त्र होऊन कोरिडोअरमध्ये चालायला सुरुवात केली. बराच वेळ सुरु असलेला गोंधळ अखेर नियंत्रणात आणला. त्यानंतर विमान 4.53 ला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. त्यावेळी सुरक्षा अधिकाऱ्यांनी तिला ताब्यात घेऊन सहार पोलिसांकडे सोपवले.