
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना काँग्रेसकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पाहिलं जात आहे. त्यामुळे भाजपक समर्थक अनेकदा राहुल गांधी यांची खिल्ली उडवत त्यांच्यावर टीका करतात. मात्र आता बहुजन समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयक जय पी सिंह यांनी देखील त्यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी आईवर गेल्यामुळे ते पंतप्रधान बनू शकत नाहीत, कारण, सोनिया गांधी या परदेशी आहेत, असं वादग्रस्त टीका सिंह यांनी केली आहे.
Agar Rahul Gandhi Rajiv Gandhi pe chala jata to ek baar ko rajneeti mein safal ho jata,lekin wo apni maa pe chala gaya, wo videshi hai.Main daave ke saath keh sakta hun Rahul Gandhi kabhi bhartiye rajneeti mein kabhi safal nahi ho sakta:Jai P Singh, expelled BSP leader (16.07.18) pic.twitter.com/68yjE8QQKD
— ANI (@ANI) July 17, 2018
जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, जयप्रकाश सिंह राहुल गांधी यांच्यावर टीका करताना म्हणाले की, राहुल गांधी हे त्यांचे पिता राजीव यांच्यापेक्षा त्यांची आई सोनिया गांधींसारखे दिसतात. त्यांची आई विदेशी वंशाची आहे. त्यामुळे राहुल कधीच पंतप्रधान बनू शकत नाहीत. त्यापेक्षा मायावती यांना निवडून द्यावं. कारण त्या दलित नेत्यापासून सर्व समाजाच्या नेत्या बनल्या आहेत. उत्तर प्रदेशसारख्या राज्याच्या त्या चार वेळा मुख्यमंत्री होत्या, असंही सिंह यावेळी म्हणाले.
जेव्हा ही बातमी सर्वत्र पसरली तेव्हा बसपा प्रमुख मायावती यांनी राष्ट्रीय समन्वयक पदावरून जयप्रकाश सिंह यांना हटवलं आहे. मायावती यांच्या म्हणण्यानुसार, सिंह यांनी पक्षाच्या धोरणाव्यतिरिक्त सार्वजनिक मंचावरून अशा प्रकारचं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ या पदावरून हटवण्यात येत आहे.

























































