जैन मूनी संत आचार्य विद्यासागर महाराजांचे निधन, 77 वर्षी घेतला अखेरचा श्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जैन धर्मियांचे दिगंबर पंथियांचे संत आचार्य विद्यासागर महाराज यांचे निधन झाले आहे. मध्यरात्री 2 वाजून 35 मिनीटांनी छत्तीसगड येथील डोंगरगड येथे त्यांचे वृद्धआपकाळाने निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. ही बातमी जैन समाजाच्या लोकांना समजताच लोकांची गर्दी उसळली. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

जैन मुनी आचार्य विद्यासागर महाराज यांनी समाधी घेतली. देह सोडण्याच्या अवघ्या तीन दिवस आधी आचार्य श्री विद्या सागर यांनी आचार्य पदाचा त्याग केला आणि तीन दिवसांपासून त्यांनी अन्न त्याग करुन अखंड मौन धारण केले होते. ज्यानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याआधी, 6 फेब्रुवारी रोजी, त्यांनी निर्यापक श्रमण मुनिश्री योगसागर यांच्याशी बोलून संघाशी संबंधित कार्यातून निवृत्ती घेतली आणि त्याच दिवशी त्यांनी आचार्य पदाचा राजीनामा दिला. आचार्य श्रींनी 8 मार्च 1980 रोजी छतरपूर येथील द्रोणगिरी तीर्थ येथे मुनी श्री समय सागर महाराज यांना आपल्या जीवनातील पहिली दीक्षा दिली. यानंतर आचार्य श्रींनी जैन संतांना अनेकवेळा दीक्षा दिली आणि त्यांना धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली. आचार्य श्री हे देशातील एकमेव जैन भिक्षू होते ज्यांनी आतापर्यंत अनेकांना दीक्षा दिली आहे. आचार्य श्रींनी 28 नोव्हेंबर 2018 रोजी उत्तर प्रदेशातील ललितपूर येथे शेवटची दीक्षा दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, आचार्य विद्यासागर महाराज यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1946 रोजी कर्नाटक येथील बेळगावातील सद्लगा गावात शरद पोर्णिमेच्या दिवशी झाला होता. आचार्य यांच्याकडून दीक्षा घेणाऱ्यांमध्ये त्यांचे भाऊ मुनी श्री समय सागर आणि मुनि श्री योग सागर तसेच बहिण शांता आणि सुवर्णा यांचाही समावेश होता. छत्तीसगड दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही डोंगरगड गाठले आणि जैन साधू विद्यासागर महाराज यांचे दर्शन घेतलं होतं.