
जगभरातील अनेक शहरे पाण्याखाली हळूहळू बुडत आहेत. चैन्नई, व्हेनिस, रॉटरडॅम, बँकॉक, आणि न्यूयॉर्क या शहरांचे भूस्खलन वेगाने होत आहे. मात्र या शहरांपेक्षाही वेगाने भूस्खलन असलेले शहर म्हणजे जकार्ता. इंडोनेशियाची राजधानी असलेल्या जकार्ताचे गेल्या 25 वर्षांत तब्बल 16 फूट भूस्खलन झाले आहे. पुढील काही वर्षांत हे शहर समुद्रात विलीन होण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तविली आहे. या शहराला वाचविण्यासाठी इंडोनेशियातील एक अब्जाधीश पुढे आला आहे.
सध्या जकार्तामधील तीनपैकी एका नागरिकाला पिण्याचे पाणी मिळत नाही आहे. पाणी टंचाई असल्याने शहरात अनेक ठिकाणी अवैध विहिरी खोदून ठेवल्या आहेत. त्यामुळे शहरातील भूगर्भातील पाणीसाठा संपुष्टात आला आहे. भूगर्भातील पाणी कमी झाल्यामुळे जमिनीवरील माती ठिसूळ होत आहे. भूगर्भातील पाणीसाठा संपुष्टात आला आहे. त्यामुळे भूस्खलनाचे प्रमाण वाढले आहे. जर प्रत्येक घरात पाण्याची पाइपलाईन आल्यास विहिरींची गरज भासणार नाही, आणि त्यामुळे होणारे भूस्खलनाला ही आपोआप आळा बसेल.
इंडोनेशिअन अब्जाधीश अँथनी सलीम यांनी जकार्ताला बूडण्यापासून वाचविण्यासाठी काही नव्या उपाय योजना करणार असल्याचे सांगितले जात आहे. अँथनी सलीम हे एका नूडल्स निर्मिती कंपनीचे मालक आहेत. सलीम यांच्या कंपनीला 1.10 कोटी लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची पाइपलाईन टाकण्याचे काम सरकार तर्फे मिळाले आहे. प्रत्येक घरात पाण्याची आली तर विहिरींची गरज भासणार नाही.
सलीम यांच्याकडे शहरातील पाच मोठे जलशुद्धीकरण प्रकल्प आहेत. सरकार तर्फे दिलेल्या जाहिरातीला केवळ दोन कंपन्यांनीच रस दाखवला. त्यापैकी हा प्रकल्प सलीम यांच्या कंपनीला देण्यात आला. त्यामुळे जकार्ता शहराला वाचवण्याची जबाबदारी सलीम यांच्यावर आली आहे.



























































