जालन्यात अवैधरित्या बाळगलेल्या दोन धारदार तलवारी जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना शहरातील कुंभारगल्ली पाणीवेश येथील दिपेश नवमहलकर याच्या घरातून सदर बाजार पोलीसांनी छापा मारुन दोन धारदार तलवारी, तसेच संशयीत दोन स्कुटी व एक आरवन फईव्ह मोटार सायकल असा एकुण 4 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई सदर बाजार पोलीसांच्या डी.बी. पथकाने काल 23 डिसेंबर रोजीच्या रात्री केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

जालना शहरात खुलेआम पिस्टल व धारदार तलवारी ताब्यात बाळगणार्‍यांची संख्या प्रचंड वाढली. त्यामुळे किरकोळ कारणावरुन मोठ्या भांडणात रुपांतर होवून जीवावर बेतणार्‍या घटना घडत आहेत. अशा घटना घडु नये म्हणून जिल्हा पोलीस प्रशासन अ‍ॅक्शवर मोडवर असून दररोज पिस्टल, तलवार, खंजीर सारखे शस्त्र जप्त करीत आहेत. काल जालना शहरातील पाणीवेश काद्राबाद भागातून सदर बाजार पोलीसांच्या डी. बी. पथकाने काल 23 डिसेंबरच्या रात्री 2 धारदार तलवारी जप्त केल्या आहेत.

काद्राबाद परिसरात राहणार्‍या दिपेश नवमहलकर याच्याकडे अवैध शस्त्रे असल्याची माहिती सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना मिळाली होती. त्यावरून सदर बाजार डी. बी. पथकाने दिपेश नवमहलकर याच्या घराची झडती घेतली असता घरामध्ये दोन तलवारी व घरासमोर दोन संशयित स्कूटी विना नंबरची व एक संशईत यामाह कंपनीची कोणताही क्रमांक नसलेली आरवन फाईव्ह मोटार सायकल आढळून आली. पोलिसांनी संशयितास सदर स्कुटी व मोटार सायकलच्या कागदपत्राबाबत व त्याचे आरसी बुक बाबत चौकशी केली असता त्यांने उद्या देतो, आज माझ्याकडेनाही, असे म्हणत उडवा -उडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन दोन तलवारी, दोन स्कुटी व एक यामाह कंपनीची आर वन फाईव्ह मोटार सायकल पोलीस ठाण्यात आणून जमा केली. याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून असा सर्व मिळून 4 लाख 12 हजारांचा किमतीचा मुद्देमाल जप्त केला.