
जम्मू-काश्मीरमधून दहशतवाद्यांचा खात्मा सुरूच आहे. आता लष्कर-ए-तौयबाचा दहशतवादी शुक्रवारी काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात चकमकीत ठार झाला. गेल्या वर्षभरात वर्षात सैनिक, स्थलांतरित कामगार आणि काश्मिरी पंडितांच्या हत्यांमध्ये तो सहभागी होता. पोलिसांनी दिलेल्या माहतीनुसार, बिलाल अहमद भट याने शोपियानमधील छोटीगाम भागात घेराबंदी आणि शोध मोहिमेदरम्यान पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफ जवानांच्या ठिकाणावर गोळीबार केला. यानंतर चकमक सुरू झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचा मृतदेह जप्त करण्यात आले आहे. जप्त करणाऱ्यात आलेल्या हत्यारांमध्ये एक एके-47 रायफल , मॅगनीज आणि अन्य सामग्री होती. बिलाल हा शोपियान येथील चेक चोलन येथे राहणारा होता आणि तो 25 वर्षांचा होता. पोलिसांच्या माहितीनुसार, बिलालने मागच्या वर्षी घाटीमध्ये अनेक लोकांना निशाणा बनवून हल्ले केले होते. तो कुलगामच्या सुदसन परिसरातील एक सेनेचा जवान उमर फैयाजच्या हत्येत सहभागी होता. बिलाल याच्यावर शोपियांमनध्ये हरमॅनमध्ये दोन प्रवाशांवर ग्रेनेड फेकण्याचा आरोप लावला होता. ज्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला होता. बिलालचे नाव तेव्हाही समोर आले होते शोपियामध्ये एक काश्मिरी पंडीत सुनील कुमार भट्ट की हत्या केली होती. या व्यतिरिक्त तो अन्य हल्ले आणि हत्येत सहभागी होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिलालने किमान 12 स्थानिक तरुणांना दहशतवादाच्या मार्गावर नेण्याचे आमिष दाखवले. पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी चोटीगाममधील चकमकीच्या ठिकाणी असलेल्या गावकऱ्यांना हा परिसर पूर्णपणे मोकळा होईपर्यंत आणि कोणतीही संभाव्य लपलेली स्फोटके काढून टाकेपर्यंत सुरक्षा दलांना सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे.
























































