हिंदुस्थान दोन आघाड्यांवर लढतोय, पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर

888

जगभरात कोरोना विरुद्ध लढाई सुरू असताना हिंदुस्थान दोन आघाड्यांवर लढत आहे. हिंदुस्थान मध्ये कोरोनाशी लढाई सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक राज्य लोकडाऊन करण्यात आली आहेत. तर जम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला आहे. सीमेपलीकडून सुरू असलेल्या गोळीबाराला हिंदुस्थानच्या जवानांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

जम्मू कश्मीरमधील सीमा भागात असलेल्या कठुआ जिल्ह्यातील हिरानागर सेक्टरच्या मान्यारी गावात सोमवारी रात्री 10 पासून मंगळवारी पहाटे 5 पर्यंत गोळीबार करण्यात आला. यामध्ये गावातील अनेक घरांचे नुकसान झाले आहे. काही मुले जखमी झाले आहेत. दरम्यान, हिंदुस्थानच्या जवानांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या