शोपियांतील चकमकीत अतिरेकी नव्हे तीन मजूर मारले गेले, जवानांवर शिस्तभंगाची कारवाई

जम्मू-कश्मीरच्या शोपियांतील अमाशीपोरा येथे 18 जुलै रोजी उडालेल्या चकमकीत तीन अतिरेकी नव्हे तर तीन मजूर ठार झाले होते असे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात लष्कराच्या वतीने दोषी जवानांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

18 जुलै रोजी शोपियांतील अमाशीपोरा येथे लष्कराशी उडालेल्या चकमकीत तीन जण ठार झाले होते. मात्र सोशल मीडियावर या चकमकीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. मारले गेलेले अतिरेकी नसून मजूर असल्याचा दावा नेटकऱयांनी केला. यावरून लष्कराने या चकमकीची चौकशी सुरू केली. चार आठवडय़ात ही चौकशी पूर्ण करण्यात आली आहे. या चौकशीत जवानांनी अफस्पा कायद्याचा भंग केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या चकमकीत सहभागी जवानांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या