जम्मू कश्मीरमध्ये शीख व्यक्तीची दहशतवाद्यांकडून हत्या

जम्मू कश्मीरच्या श्रीनगर शहरात दहशतवाद्यांनी एका शीख व्यक्तीवर गोळीबार केला. या गोळीबारात एक जणखमी झाला आहे. अमृतपाल असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो मूळचा पंजाबचा होता. या घटनेनंतर लष्कराच्या जवानांनी संपूर्ण परिसर रिकामा करत शोध मोहीम सुरू केली.

या हल्ल्यात जखमी झालेल्या रोहीत नावाच्या तरुणाला पोलिसांनी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.