
सामना ऑनलाईन। श्रीनगर
जम्मू-कश्मीरमधील शोपियां जिल्हयातील अवनीरा भागात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. हे दहशतवादी जम्मू-कश्मीरचेच रहिवासी असून त्यांची नावे अहम भट आणि शाकिर अहमद वगाय अशी आहेत. हे दोघे दहशतवादी ‘अंसार गजवा तुल हिंद’ या दहशतवादी संघटेनेसाठी काम करायचे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरक्षा दल या दोघांच्या शोधात होते.
या चकमकीआधी जम्मू- कश्मीरमधील अनंतनाग येथे पहाटे सुरक्षा दलाचे जवान व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले. यावेळी अनंतनाग जिल्हातील नौगाम मधील शाहबाद येथे जवानांनी 2 ते 3 दहशतवाद्यांना घेरले होते. दरम्यान, पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच असून 6 जूनपर्यंत सुरक्षा दलाने 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार 2019 मध्ये सुरक्षा दलाने आतापर्यंत 106 दहशतवादी ठार केले आहेत. 2018 मध्ये 254 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.
Jammu & Kashmir: Two terrorists have been neutralised in an encounter between terrorists and security forces which broke out earlier this morning, in Awneera area of Shopian district. Search operation is underway. (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/9pQIc4n3N4
— ANI (@ANI) June 11, 2019
























































