
हिंदुस्थानचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह आयसीसी (ICC) कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. बुमराह त्याच्या कारकीर्दीत प्रथमच आयसीसी (ICC) क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. तसेच कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान गाठणारा बुमराह चौथा हिंदुस्थानी गोलंदाज तर पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे.
जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात 91 धावांच्या मोबदल्यात 9 विकेट्स घेतल्या होत्या. टीम इंडियाच्या विजयात त्याचा मोलाचा वाटा होता. त्यामुळेच तो या सामन्यात ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरला. त्याच्या या कामगिरीमुळे जसप्रीत बुमराहच्या कसोटी क्रमावीरत सुधारणा झाली असून तो आयसीसी (ICC) कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान झाला.
जसप्रीत बुमराह आयसीसी (ICC) कसोटी गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान पटकवनारा पहिला हिंदुस्थानी वेगवान गोलंदाज ठरला आहे. याआघी हिंदुस्थानी वेगवना गोलंदाज कपिल देव कसोटी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले होते. कसोटी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर विराजमान होणारे, कपिल देव हे हिंदुस्थानचे पहिले वेगवान गोलंदाज होते. कपिल देव डिसेंबर 1979 ते फेब्रुवारी 1980 या दरम्यान कसोटी गोलंदजांच्या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर होते. कपिल देव यांच्या नंतर झहिर खान हिंदुस्थानच्या वेगवान गोलंदाजांमध्ये तिसऱ्या क्रमांका पर्यंत मजल मारण्यात यशस्वी ठरला होता. ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2010 दरम्यान झहीर खान कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर होता.
कपिल देव आणि झहीर खान या हिंदुस्थानच्या वेगवान गोलंदांव्यतिरीक्त इतर कोणत्याच टीम इंडियाच्या गोलंदाजांना कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या तीन स्थानांवर विराजमान होता आले नव्हते. पण जसप्रीत बुमराहने कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिला क्रमांक पटकावला आहे. हिंदुस्थानचा फिरकीपट्टू रविचंद्रन अश्विनला मागे टाकत बुमराहने पहिला क्रमांक पटकवला. कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचणारा बुमराह हा हिंदुस्थानचा चौथा खेळाडू आहे. याआधी बिशनसिंग बेदी, रविंद्र जडेजा, अश्विन हे हिंदुस्थानचे गोलंदाज क्रमवारीत अव्वल स्थानी पटकवण्यात यशस्वी ठरले आहेत. आयसीसी (ICC) कसोटी गोलंदाजी क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असणाऱ्या बुमराहचे आता 881 रेटींग गुण आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या कागिसो रबाडाचे 851 रेटींग गुण तर रविंचद्रन अश्विन 841 रेटींग गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

























































