
जत तालुक्यातील दारीबडची येथे वीज कोसळून वयोवृद्ध शेतकरी संगाप्पा संनाप्पा पुजारी (70) यांचा मृत्यू झाला, तर दोन म्हशीही विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडल्या आहेत. शुक्रवारी दुपारी तीन ते नऊ वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील अनेक गावांत अवकाळी पावसाचा तडाखा बसला.


























































