भाषण करताना ढसा ढसा रडल्या जयाप्रदा, व्हिडीओ व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लखनौ

प्रसिद्ध अभिनेत्री व भाजपच्या रामपूर मतदारसंघाच्या उमेदवार जया प्रदा या बुधवारी प्रचारसभेत ढसाढसा रडल्या. त्यानंतर चाहत्यांनी त्यांच्या नावाच्या घोषणा देत त्यांना शांत केले. रामपूर मतदारसंघातून जयाप्रदा या सपा नेते आझम खान यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. जया प्रदा यांचा रडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

गेली अनेक वर्ष समाजवादी पार्टीच्या नेत्या असलेल्या जया प्रदा यांनी 26 मार्च रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना भाजपकडून रामपूर मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. आज त्यांची रामपूरमध्ये प्रचारसभा होती. त्या प्रचारसभेच्यावेळी त्या जेव्हा भाषण करायला उठल्या तेव्हा जनतेने त्यांच्या नावाच्या घोषणा दिल्या. ते बघून जया प्रदा यांचे मन भरून आले व त्या ढसाढसा रडू लागल्या. त्यानंतर भाजप नेत्यांनी त्यांना शांत केले व नंतर त्यांनी भाषण करण्यास सुरुवात केली.

‘आज पहिल्यांदाच मला असं वाटतंय की सर्व शक्ती माझ्यासोबत आहे. भाजप मला सर्व प्रकारे पाठिंबा देत आहे. भाजपचे सर्व मंत्री माझ्यासोबत आहेत. मलाही जगण्याचा व तुमच्या सर्वांची सेवा करण्याचा अधिकार आहे. मला अभिमान आहे की मी त्या पक्षासोबत आहे जो पक्ष महिलांचा सन्मान व सुरक्षेसाठी झटतो. आमचे पंतप्रधान, आमचचे नेते नरेंद्र मोदीजी देशाच्या सुरक्षेसाठी खूप मेहनत घेत आहेत’