इंडोनेशिया विमान दुर्घटनेसारखाच जेट, स्पाईसजेटच्या विमानांना धोका

32

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

इंडोनेशियामध्ये गेल्या महिन्यात इंडोनेशियामध्ये लॉयन एअर कंपनीच्या बोईंग 737 मॅक्स जातीच्या विमानाच्या सेन्सरमध्ये बिघाड झाल्यामुळे विमान कोसळले होते. त्या पार्श्वभूमीवर, बोईंग 737 मॅक्स विमाने असलेल्या जेट एअरवेज आणि स्पाईसजेट विमान कंपन्यांना खबरदारीच्या उपाययोजना आखण्याचे आदेश नागरी हवाई वाहतूक प्राधीकरणाने (डीजीसीए) दिले आहेत.

इंडोनेशियात विमानाची दुर्घटना झाल्यानंतर अमेरिकेच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणानेही अशा विमानांच्या सुरक्षेसंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या.

बोईंग 737 मॅक्स विमानांमधील सेन्सरमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण होऊ लागला आहे. सेन्सरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमान नेमके किती उंचीवर आहे, ते वैमानिकाला समजत नाही. त्यामुळे विमानाचे नियंत्रण करणे वैमानिकाला शक्य होत नाही. परिणामी अपघात होऊ शकतो.

बोईंग कंपनीने यासंदर्भात ऑपरेशन मॅन्युअल बुलेटिन जाहीर केले होते. त्या धर्तीवर डीजीसीएनेही हिंदुस्थानी विमान कंपन्यांना फ्लाईट मॅन्युअलमध्ये बदल करण्यास सांगितले आहे.

जकार्तामध्ये लॉयन एअर कंपनीच्या बोईंग 737 मॅक्स जातीचे विमान उड्डाणानंतर काही वेळातच समुद्रात कोसळले होते. विमानात 180 प्रवासी होते.

विमान वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी इंडोनेशियाच्या अपघातानंतर अशा प्रकारची विमाने असलेल्या हिंदुस्थानी विमान कंपन्यांना त्यांच्या विमानांचा आढावा घेण्यास सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या