ट्रेलरने फरफटत नेल्याने 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू, झारखंडमध्ये ‘कंझावला’सारखी घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काहीदिवसांपूर्वीच दिल्ली येथे घडलेल्या कंझावला घटनेने देश हादरला होता. अशीच काहीशी घटना झारखंड येथे घडली आहे. झारखंडमध्ये ट्रेलरने फरफटत नेल्याने 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. रांची-मुरी रस्त्यावरील गोंडलीपोखर पेट्रोल पंपाजवळ हा अपघात घडला. या ट्रेलरने विद्यार्थ्यांना 3 किमीपर्यंत फरफटत नेले. यात दुचाकीवरून चाललेल्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. आकाश महतो (17) आणि क्रिश मुंडा (18, रा. अंगदा मासू) अशी मृतांची नावे आहेत. तर रुपेश मुंडा (18) हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे.

बुधवारी रात्री 11.30 वाजता सल्हान येथे आयोजित नागपूरी ऑर्केस्ट्रा पाहून हे तिघे विद्यार्थी दुचाकीवरून घरी परतत होते. दरम्यान मागून येणाऱ्या ट्रेलरने त्यांना धडक दिली. यादरम्यान रुपेश खाली पडून जखमी झाला. तर आकाश आणि क्रिश दुचाकीसह ट्रेलरमध्ये अडकले. या दोघांनाही ओढत ट्रेलर रस्त्यावरून धावत होता. यानंतर तीन किमी अंतरावर देघांचे मृतदेह आढळून आने. तर घटनास्थळापासून चार किलोमीटर अंतरावर दुचाकीचे तुकडे सापडले.