पेंग्विनमुळे राणीच्या  बागेची कोटींची उड्डाणे! वार्षिक उत्पन्न पाच कोटींवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात पेंग्विन आल्यापासून उत्पन्नात प्रचंड वाढ झाली असून वार्षिक उत्पन्न 73 लाखांवरून थेट पाच कोटींवर गेले आहे. यातच गेल्या काही दिवसांत राणीच्या बागेचा कायापालट करून नवीन पक्षी-प्राणी आणले जात असल्यामुळे मुंबईकर आणि देशविदेशातील पर्यटकांसाठी चांगलीच संधी निर्माण झाली आहे.

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात मार्च 2017 रोजी पेंग्विन कक्ष पर्यटकांसाठी खुला केल्यानंतर पर्यटकांचा ओघ चांगलाच वाढला आहे.  राणीच्या बागेत याआधी प्रतिव्यक्ती केवळ 2 ते 5 रुपये शुल्क आकारले जात होते. मात्र 1 ऑगस्ट 2017 पासून हे शुल्क दोन प्रौढांसह दोन मुलांना 100 रुपये करण्यात आले आहे. पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना पेंग्विनची सफारी मोफत करण्यात आली आहे. शुल्कवाढ करण्याआधी असणार्‍या तुटपुंज्या शुल्कामुळे ‘नाहक’ होणारी गर्दी कमी झाली असून उत्पन्नात दरमहा एक ते दोन लाख तर वार्षिक 40 लाखांवर येणारे उत्पन्न आता थेट चार ते पाच कोटींवर गेले आहे.

penguine-stasts