जिओ इन्स्टिटय़ूटने सुरू केले पदव्युत्तर अभ्यासक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिलायन्स जिओ इन्स्टिटय़ूटने दोन पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केले आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्समधील डिजिटल मीडिया आणि मार्केटिंग कम्युनिकेशन्स या अभ्यासक्रमाची पहिली बॅच 21 जुलैपासून सुरू झाली आहे.

जिओ इन्स्टिटय़ूटच्या पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम्सच्या पहिल्या गटामध्ये देशातील 19 राज्ये आणि दक्षिण आफ्रिका, भूतान, नेपाळ आणि घाना या चार इतर देशामध्ये हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमासाठी अभियांत्रिकी, विज्ञान, कला, वाणिज्य, मास मीडिया आणि व्यवस्थापनाचे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. दोन्ही एक वर्षाचे पदव्युत्तर अभ्यासक्रम असून नामवंत प्राध्यापकांकडून शिकविण्यात येणार आहेत.

दोन्ही अभ्यासक्रमांद्वारे जिओ इन्स्टिटय़ूट आवश्यक जीवन कौशल्ये विकसित करण्यावर भर देणार आहे. जिओ इन्स्टिटय़ूटने परदेशात अभ्यासाची योजना आखली आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना प्रसिद्ध जागतिक विद्यापीठाशी संपर्क साधता येणार आहे. यासह जिओ इन्स्टिटय़ूट कॅपस्टोन प्रकल्पांद्वारे ऍप्लिकेशनवर-आधारित शिक्षणावर भर देणार आहे.