…तर पोलीस पाकीट मारल्याचा गुन्हा दाखल करतील, जितेंद्र आव्हाडांचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड हे गेल्या काही दिवसांपासून वादात अडकले आहेत. कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाच्या उद्घाटनावेळी विनयभंग केल्याची तक्रार एका महिलेने केली होती. त्यामुळे त्यांच्यावर 354 अंतर्गत गुन्हाही दाखल झाला होता. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही उपस्थिती होती. त्यामुळे आव्हाड आता सावध झाल्याचे पाहायला मिळत आहे.

आज ठाण्यातील एका कार्यक्रमाचे निमंत्रण नाकारत आव्हाड यांनी सोशल मीडियावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह भाजपला खोचक टोला लगावणारे ट्विट केले आहे. आज ठाणे महापालिकेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही योजनांचे शुभारंभ आहे. आमंत्रण दिले महापालिकेनी पण ब्रिजच्या उद्घाटनात त्यांच्या 8 फूट अंतरावर माझ्यावर 354 चा गुन्हा दाखल झाला. ते स्वतः साक्षीदार आहेत.

आज त्यांच्या बाजुला उभा राहीन आणि पोलीस पाकीट मारल्याचा गुन्हा दाखल करतील. त्या पेक्षा कार्येक्रमाला न गेलेले बरं. परत पोलीस म्हणतील दबाव होता आणि सीएम म्हणतील तुला माहीत आहेना मी हे करू शकत नाही, तुला कस कळत नाही. खरच कळत नाही, चलो ये वक्त भी गुजर जयेग. u too brutas, असे खोचक ट्विट आव्हाड यांनी केले आहे.

विनयभंगाचा गुन्हा

कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाच्या उद्घाटनावेळी विनयभंग केल्याची तक्रार एका महिलेने केली होती. याबाबत आव्हाडांविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता. आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर व्यथित झाले होते. भर पत्रकार परिषदेत त्यांचा कंठही दाटून आला होता. तसेच त्यांनी त्यावेळी आमदारकीचा राजीनामाही देऊ केला होता. मात्र विरोधपक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांची समजूत घातली होती.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)