एअर इंडियाची गगनचुंबी इमारत ‘जेएनपीटी’ला विकणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

एअर इंडियाचे एकेकाळी मुख्यालय असलेली मुंबईच्या नरीमन पॉइंट येथील २३ मजल्यांची शानदार बिल्डिंग ‘जेएनपीटी’ला विकण्यात येणार आहे. ती इमारत नरीमन पॉइंटची जागतिक पातळीवर ओळख बनली होती.

त्या इमारतीच्या विक्रीच्या प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तत्त्वतः मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी आज दिली. एअर इंडियाच्या खासगीकरणाचा प्रयत्न फसल्याच्या पार्श्वभूमीवर नरीमन पॉइंट येथील इमारत विकण्याच्या निर्णयाला विशेष महत्त्व दिले जाते. अतिशय मोक्याच्या जागी असलेल्या त्या इमारतीच्या विक्रीतून घसघशीत रक्कम पदरात पडेल, अशी सरकारची अपेक्षा आहे.