
पोलीस व पालिकेने संयुक्तरित्या केलेल्या उत्तम नियोजनामुळे शनिवार व रविवारी जुहू चौपाटीवर लाडक्या बाप्पांचे कुठल्याही विघ्नाविना विसर्जन सोहळा पार पडला. गतवेळपेक्षा आणखी जागा गणेश मंडळांसाठी उपलब्ध केल्याने वाहतुकीचा कुठलाही खोळंबा झाला नाही.
गौरी गणपती व सात दिवसांच्या बाप्पांचे मोठय़ा भक्तिभावात विसर्जन व्हावे. भक्तांना कुठलाही त्रार होऊ नये याची सांताक्रुझ पोलिसांनी सर्वतोपरी उपाययोजना केल्या होत्या. पालिका अधिकाऱयांसमवेत बैठका घेऊन जुहू चौपाटीवर कुठलाही गडबड गोंधळ होणार नाही, झटपट विसर्जन करून भक्तांना सहीसलामत चौपाटीवरून निघता येईल याची विशेष दखल उपायुक्त मोहित कुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली एसीपी गावकर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय मसवेकर व त्यांच्या पथकाने केली होती. परिणामी स्वरूप दोन्ही दिवशी सुरळीत व झटपट विसर्जन सोहळा पार पडला.
ड्रोनच्या मदतीने देखरेख
पोलिसांनी चौपाटीवर उसळलेल्या गर्दीवर ड्रोनच्या सहाय्याने वॉच ठेवला होता. विशेष म्हणजे कुठेही गर्दी होऊ नये, समाजपंटक व गुन्हेगारी वृत्तीचे लोक पटकन पकडले जावे याकरिता पोलिसांनी एआयची मदत घेतली होती.

























































