प्रवाशांसाठी महत्त्वाचे! 17 जुलै रोजी प. रेल्वेमार्गावर जम्बो ब्लॉक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या दुरुस्ती देखभालीसाठी, चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान रविवार, 17 जुलै 2022 रोजी सकाळी 10:35 ते 15:35 या वेळेत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर पाच तासांचा जंबो ब्लॉक घेण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, ब्लॉक कालावधीत चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान सर्व धिम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावर चालवल्या जातील. त्यामुळे काही अप आणि डाऊन उपनगरीय गाड्या रद्द राहतील. याबाबतची सविस्तर माहिती संबंधित स्टेशन मास्टर्सकडे उपलब्ध आहे. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन देखील रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.