रोनाल्डोच्या नव्या जर्सीला तुफान मागणी; क्लबची साईटच क्रॅश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन | रोम

यंदाच्या २१व्या फिफा विश्वचषकातून सुपरस्टार क्रिस्टियानो रोनाल्डोचा पोर्तुगाल संघ बाहेर पडला आहे. असे असले तरी रोनाल्डोने नव्याने प्रवेश घेतलेल्या युव्हेंटसच्या ७ नंबरच्या जर्सीला जगभरातून तुफान मागणी आली आहे. या क्रमांकाची जर्सी युव्हेंटसने रिअल माद्रिद सोडणाऱ्या रोनाल्डोला बहाल केली आहे. पोर्तुगाली स्टार क्रिस्टियानोने नुकताच इटलीच्या युव्हेंटस क्लबमध्ये प्रवेश केला आहे. क्लबने त्याला दिलेल्या ७ नंबरी जर्सीला जगभरातून एवढी ऑनलाईन मागणी आली की युव्हेंटसची साईटच क्रॅश झाली आहे.

सुपरस्टार रोनाल्डोने स्पेनच्या रिअल माद्रिद क्लबचे प्रतिनिधित्व ९ वर्षे केले होते. नुकताच तो १,७७४ कोटी रुपयांचे हस्तांतरण शुल्क स्वीकारून ४ वर्षांसाठी युव्हेंटसमध्ये सामील झाला आहे. ३३ वर्षीय रोनाल्डोचा सन्मान म्हणून युव्हेंटसने त्याला त्याची ७ नंबरी जर्सी पुन्हा दिली.