बहुप्रतीक्षित ‘कलंक’चा टीझर प्रदर्शित, 21 वर्षांनी माधुरी आणि संजय पुन्हा एकत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

माधुरी दीक्षित आणि संजय दत्त अभिनित ‘कलंक’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात संजय आणि माधुरीसोबत वरुण धवन, आदित्य रॉय कपूर, आलिया भट, सोनाक्षी सिन्हाही या चित्रपटात दिसणार आहेत.

अभिषेक वर्मन दिग्दर्शित या चित्रपटात ऐतिहासिक काळ दाखवण्यात आला आहे, असं सध्यातरी टीझरवरून दिसतंय. मात्र, अद्याप या काळाचा किंवा यातील कोणत्याही व्यक्तिरेखेचा उलगडा झालेला नाही. त्यासाठी प्रेक्षकांना टीझरची वाट पाहावी लागणार आहे. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे 21 वर्षांनी माधुरी आणि संजय मोठ्या पडद्यावर दिसणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. संजय आणि माधुरीचा शेवटचा एकत्र प्रदर्शित झालेला चित्रपट 1997मधला महानता हा होता. त्यानंतर आता 21 वर्षांनी ते दोघे पुन्हा एकसाथ दिसत आहेत. करण जोहर निर्मित आणि अभिषेक वर्मन दिग्दर्शित कलंक येत्या 17 एप्रिल 2019 रोजी प्रदर्शित होत आहे.

पाहा टीझर-