#CORONA कळसुबाई शिखरावर पर्यटनासाठी बंद

908

महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असलेल्या कळसू बाई शिखरावरील पर्यटन कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आले आहे. बारी ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतला असून त्याबाबतचे पत्रक त्यांनी प्रसिद्ध केलं आहे. तसेच या बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांना पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात येऊ शकतो.
..
दररोज शेकडो पर्यटक देतात कळसूबाईला भेट देत असतात. कोरोना व्हायरसमुळे सध्या सर्वत्र विविध कार्यक्रमांना अथवा एकत्र येण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी एकत्रित येऊन याबाबत बैठक घेतली आहे.

आदेशाचे उल्लंघन केल्यास 5000 दंड होणार…
बारी ग्राम पंचायतीने फलक लावून पर्यटकांना सुचित केले असून कोणीही या ठिकाणी येऊ नये असे आवाहन केले आहे ग्रामपंचायतीने याची विशेष सभा घेऊन याबाबतचा निर्णय घेतला आहे तसेच या पायथ्याशी त्याचा फलक सुद्धा लावण्यात आलेला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या