कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतून वगळलेल्या 18 गावांची स्वतंत्र नगर परिषद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतून वगळलेल्या 18 गावांची स्वतंत्र नगर परिषद करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील 28 गावांपैकी 18 गावांसाठी स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्यात येणार असल्याचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील आठवडय़ात विधान परिषदेत केले होते. त्यानंतर आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अठरा गावांची स्वतंत्र नगर परिषद करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोकण विभागीय आयुक्त यांनी दिलेल्या अभिप्रायावरून वरीलप्रमाणे स्वतंत्र नगर परिषदेचा निर्णय घेण्यात आला.

वगळण्यात आलेली नावे
वगळण्यात आलेली गावे पुढीलप्रमाणे – घेसर, हेदुटणे, उंब्रोली, भाल, द्धारली, माणेरे, वसार, आशेळे, नांदिवली तर्फे अंबरनाथ, आडिवली-ढोकली, दावडी, चिंचपाडा, पिसवली, गोळीवली, माणगाव, निळजे, सोनारपाडा व कोळे.

उर्वरित नऊ गावे
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील उर्वरित नऊ गावे पुढीलप्रमाणे – आजदे, सागाव, नांदिवली पंचानंद, धारिवली, संदप, उसरघर, काटई, भोपर व देसलेपाडा.