
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे सोमवारपासून कडक निर्बंध लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आजचा कणकवली आठवडा बाजार बंदचे संबंधित प्रशासनाने काल जाहिर केले होते. मात्र, आज सकाळ पासून बाजारपेठेत गर्दी झाल्यामुळे पोलिसांनी इतरही दुकाने (अत्यावश्यक सेवा वगळता ) बंद केली. गर्दी टाळा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करा, अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा कणकवली पोलिसांनी व्यापाऱ्यांना दिला आहे.
दरम्यान, संबंधित प्रशासनाने फक्त आठवडा बाजार बंदच जाहिर केले होते. मात्र नियमित दुकानांबाबत काही सुचना मिळाल्या नसल्याने आज सकाळी कणकवली बाजारपेठेतील दुकाने रोजच्या प्रमाणे खुली करण्यात आली होती. परंतु, गर्दी होण्यास सुरूवात झाल्याने कणकवली पोलिसांनी ध्वनीप्रक्षेपाने बंदचे हाक देत जनजागृती करत कोरोनावर शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. तर यावेळी विनाकारण तसेच मास्क शिवाय फ़िरणाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात येत आहे.

























































