
कन्नमवार नगरातील नागरिकांना सुसज्ज आणि सुशोभित असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मैदान मिळाले आहे. या मैदानाचे लोकार्पण शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या हस्ते आज झाले.
आमदार सुनील राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नगरसेवक उपेंद्र सावंत यांनी नगरसेवक निधीतून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मैदानाचे सुशोभीकरण केले. या मैदानातील वॉकिंग ट्रक, पदपथाच्या दुरुस्तीची गरज होती. दुरुस्ती आणि सुशोभीकरणानंतर हे मैदान पुन्हा नागरिकांसाठी उपलब्ध झाले आहे.
याप्रसंगी शिवसेना सचिव आदेश बांदेकर उपस्थित होते. कन्नमवार नगरमध्ये शिवसेना करत असलेल्या कार्याचे त्यांनी काwतुक केले. माजी महापौर दत्ता दळवी, महिला विभाग संघटक संध्या वढावकर, नगरसेविका सुवर्णा करंजे, उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव, अनंत पाताडे, धर्मनाथ पंत, विधानसभा संघटक परम यादव, संदीप सावंत, उपविभाग संघटक रश्मी पहुडकर, प्रशांत दास, मामा मंचेकर, विजय सोनमळे यांच्यासह सर्व शाखाप्रमुख, पदाधिकारी, शिवसैनिक आणि युवासेनेचे कार्यकर्ते आदी याप्रसंगी उपस्थित होते.
शिवतीर्थासारखीच या मैदानाचीही ओळख व्हावी – संजय राऊत
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यावेळी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, ‘धर्मवीर संभाजी महाराज मैदान शिवतीर्थाची आठवण करून देते. शिवतीर्थावर शिवसेनेच्या भव्य सभा भरतात तसे शिवसेनेच्या माध्यमातून या मैदानावरही भव्य कार्यक्रम घेत चला. या मैदानालाही शिवसेनेच्या माध्यमातून ओळखले जावे. शिवसेना म्हणजे वाघ आहे, त्रास देणाऱया कुत्र्या-मांजरांची काही चिंता करू नका. ते वाघाला काहीच करू शकत नाहीत.


























































