
सध्या दाक्षिणात्य चित्रपटांना सुगीचे दिवस आले आहेत. एकामागोमाग एक चित्रपट हिट होत आहेत. यात आता कन्नड चित्रपट ‘कांतारा’चाही समावेश झाला आहे. ऋषभ शेट्टीच्या या चित्रपटाने कन्नडमध्ये चांगली कमाई केल्यानंतर गेल्या आठवड्यात हा चित्रपट हिंदीमध्येही प्रदर्शित झाला. हिंदीमध्ये या चित्रपटाचे कोटींच्या कोटी उड्डाणं सुरू आहेत.
बॉक्स ऑफिसवर ‘कांतारा’ चित्रपट सध्या बुलेटच्या वेगाने कमाई करतोय. तिसऱ्या आठवड्यामध्येही चित्रपटगृहांमध्ये गर्दी होताना दिसतेय. 16 कोटी रुपयांचे बजेट असणाऱ्या या चित्रपटाने आतापर्यंत 10 पट कमाई केली आहे.
हिंदुस्थानमध्ये ‘कांतारा’ने 146 कोटींची कमाई केली असून लवकरच 150 कोटींच्या पार जाण्याची शक्यता आहे. हिंदीमध्येच या चित्रपटाने आतापर्यंत 17 कोटी कमावले आहेत. तर जगभरात या चित्रपटाची कमाई 200 कोटींच्या पार पोहोचली आहे.
#Kantara *#Hindi version* continues its victory march… Day 8 [second Fri] is HIGHER than Day 1, 4, 5, 6, 7… The festive season [#Dhanteras, #Diwali] will only boost its biz… [Week 2] Fri 2.05 cr. Total: ₹ 17.05 cr. #India biz. Nett BOC. pic.twitter.com/EPwn7H3Yk6
— taran adarsh (@taran_adarsh) October 22, 2022
दुसरीकडे बॉलिवूडचा बहुचर्चित चित्रपट ‘डॉक्टर जी’ देखील याच काळात प्रदर्शित झाला आहे. मात्र ‘कांतारा’च्या तुलनेत याला थंड प्रतिसाद मिळतोय. चांगली ओपनिंग मिळाल्यानंतरही हा चित्रपट गर्दी खेचू शकला नाही. आयुष्मान खुराना याची प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसात 15 कोटी कमावले. मात्र ‘कांतारा’ चित्रपटगृहात आल्यापासून ‘डॉक्टर जी’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर प्रभाव पडला आहे. आठ दिवसात हा चित्रपट 23 कोटींपर्यंतच पोहोचू शकला.
काय आहे कांतारा?
कर्नाटकमधल्या एका छोट्या गावातली गोष्ट ‘कांतारा’मध्ये दाखवण्यात आली आहे. स्वत:ला राजा म्हणवून घेणारा जमीनदार आणि गावामध्ये राहणारे गरीब, अशिक्षित शेतकरी यांच्यामधील संघर्ष या चित्रपटामध्ये पाहायला मिळतो. रिषभ व्यतिरिक्त सप्तमी गौडा, किशोर, अच्युत कुमार अशा कलाकारांनी या चित्रपटामध्ये काम केले आहे. दिग्दर्शक अभिनेता अशा दोन्ही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या स्वतःच्या खांद्यावर पेलत रिषभ शेट्टीने ‘कांतारा’ सुपरहीट करून दाखवला आहे

























































