कपिल शर्माला कन्यारत्न, सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव

1958

कपिल शर्मा शो, कॉमेडी नाइट्स विथ कपिल अशा गाजलेल्या शोंमधून प्रसिद्धीला आलेला विनोदवीर कपिल शर्मा बाबा झाला असून त्याला कन्यारत्न झालं आहे. खुद्द कपिलनेच ही माहिती ट्विटरवरून आपल्या चाहत्यांना दिली आहे.

बॉलिवूडमधले जवळपास सर्वजण कपिलला चांगलेच ओळखतात. त्यामुळे त्याच्या या आनंदाच्या क्षणी अनेक सेलिब्रिटींनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. यात गायक गुरु रंधावा, अभिनेत्री राकुल प्रीत सिंह, दिया मिर्झा, नुसरत भरूचा, अभिनेता किकू शारदा, राहुल देव, बॅडमिंटनपटू सायना नेहवालसह अनेक सेलिब्रिटींनी कपिलला या त्याच्या आयुष्यातील नव्या पर्वाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

कपिल शर्माचा विवाह 12 डिसेंबर 2018 रोजी गिन्नी चतरथ हिच्याशी झाला होता. जवळपास सगळं बॉलिवूड या लग्नासाठी हजर होतं. त्यामुळे त्याचा विवाह चांगलाच चर्चेत आला होता.

आपली प्रतिक्रिया द्या