
व्हिसा घोटाळय़ातील मनी लॉण्डरिंग प्रकरणी खासदार कार्ती चिदंबरम यांना विशेष सीबीआय न्यायालयाने आज झटका दिला आहे. 2011 मध्ये तलवंडी साबो वीज योजनेच्या उभारणीसाठी 263 चिनी कर्मचाऱयांना व्हिसा देताना 50 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी कार्ती चिदंबरम यांची 28 मे रोजी सीबीआयने तिसऱयांदा चौकशी केली आहे. या प्रकरणात मनी लॉण्डरिंग झाल्याचा संशय आहे. त्या पार्श्वभूमीवर कार्ती चिदंबरम यांनी अंतिम जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी झाल्यानंतर न्यायलयाने आज चिदंबरम यांचा अर्ज फेटाळला आहे.
























































