कर्तव्यने जिंकली ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धा

हीरक महोत्सवाकडे पुढील वर्षी वाटचाल करणाऱया माझी माऊली देवी-सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ, जेजे हॉस्पिटल परिसर, भायखळातर्फे इन्स्टिटय़ूट फॉर चेस एक्सलंट व आयडियल स्पोर्टस् अॅपॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या माझी माऊली चषक अखिल हिंदुस्थानी स्तरावरील खुल्या ऑनलाइन मोफत प्रवेशाच्या बुद्धिबळ स्पर्धेत गुजरातचा कर्तव्य अनाडकट विजेता ठरला.

कर्तव्यने 14 पैकी सर्वाधिक साखळी 12 गुण घेतले. हरयाणाचा ग्रँडमास्टर हिमांशू शर्माने साखळी 13.5 गुण नोंदवून उपविजेतेपद पटकाविले. मुंबई शहर बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने झालेल्या मोफत प्रवेशाच्या ऑनलाइन स्पर्धेत आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित बुद्धिबळपटूंसह 215 खेळाडूंनी भाग घेतला.

लिचेस प्लॅटफॉर्मवर साखळी 14 सामने रंगतदार झाले. स्पर्धेमधील तृतीय क्रमांक कोलकात्याच्या आंतरराष्ट्रीय मास्टर राजदीप सरकारने (11.5 गुण), चौथा क्रमांक आंध्र प्रदेशच्या रामी रेड्डीने (11 गुण), पाचवा क्रमांक सेर्बियाच्या करीम मेरहीने (10.5 गुण), सहावा क्रमांक तामीळनाडूच्या आर. सैलेशने (10 गुण), सातवा क्रमांक पनवेलच्या स्नेहल भोसलेने (10 गुण) तर आठवा क्रमांक मुंबईच्या अनिरुद्ध पोतवाडने (10 गुण) पटकावला.

स्पर्धेतील रोख 10 पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन संयोजक शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण, मुंबई शहर बुद्धिबळ संघटनेचे सेव्रेटरी अरेना मास्टर राजाबाबू गजंगी व नवरात्र महोत्सव मंडळाचे पदाधिकारी यांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या