नाशिक : किसान रेल्वेने उत्तर हिंदुस्थानात पोहोचले 1127 टन डाळिंब

657

देशातील पहिली देवळाली ते मुजफ्फरपूर किसान रेल्वे सुरू होऊन अवघे सहा आठवडे उलटले. यादरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या नाशिकसह महाराष्ट्रातील डाळिंबाची देशांतर्गत बाजारपेठेत मागणी वाढली आहे. किसान रेल्वेने उत्तर हिंदुस्थानात आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे 1 हजार 127.67 टन डाळिंब पोहोचवण्यात यश आले आहे.

किसान रेल्वेचा नाशिकजवळील देवळाली स्थानकावरून 7 ऑगस्टला शुभारंभ झाला. पहिल्या आठवडय़ात ही रेल्वे दानापूरपर्यंत धावली. दुसऱया आठवडय़ापासून तिचे शेवटचे स्थानक मुजफ्फरपूर करण्यात आले. शेतमालाची स्वस्त दरात सुरक्षित आणि वेगवान वाहतूक होत असल्याने उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱयांचा या रेल्वेला चांगला प्रतिसाद मिळाला. मागणीप्रमाणे प्रथम आठवडय़ातून दोनदा, तर मागील आठवडय़ापासून ही रेल्वे आठवडय़ातून तीनदा धावत आहे. डाळिंब,भाज्या,शिमला मिरची,लिंबू,फुलकोबी,आईस्ड फिश यांची वाहतूक होत आहे. यात सर्वाधिक 1127.67 टन इतके डाळिंब उत्तर हिंदुस्थानात पाठवण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या