
उत्तरप्रदेशातील देवरिया येथे एका स्टंटबाजला सापासोबत मजामस्ती करणे जीवावर बेतले आहे. दरम्यान या स्टंटबाजाला सापाने दंश केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष (40) असे त्या मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याला विषारी साप पकडण्याचा होता. परिसरात विषारी साप दिसल्यास लोकं संतोषला त्या सापाला पकडायला बोलवायचे. त्यावेळी तो तिथे येऊन पुन्हा सापाला जंगलात सोडायचा. असेच एक प्रकरण समोर आले आहे. जमुआ गावात एक विषारी साप दिसला त्यावेळी नेहमीप्रमाणे ग्रामस्थांनी संतोषला बोलावले. त्याने अवघ्या 10 मिनीटात तो साप पकडला. त्यानंतर तो साप कपड्यात गुंडाळुन तो घरी परतला.
गावात आल्यानंतर संतोषने गावातील लोकांसमोर सापासोबत स्टंटबाजी दाखवायला सुरुवात केली. लोकांनी त्याला सापासोबत खेळण्यास रोखले. मात्र त्याने कोणाचेही ऐकले नाही. संतोषने कितीवेळा आपल्ा जीभेने सापाला स्पर्श केला, कधी सापाला मुके देत होता, कधी तो सापाला खांद्यावर घेऊन खेळ करत होता तर कधी जमिनीवर सोडत होता. या दरम्यान सापाने त्याला दंश केला, त्याला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर हालत गंभीर असल्याचे पाहता त्याला देवरियाचे जिल्हा रुग्णालय रेफर केले मात्र त्या दरम्यान त्याचा मत्यू झाला होता.
ग्रामस्थांच्या माहितीनुसार, संतोष हा त्यावेळी दारुच्या नशेत होता. नशेमध्ये तो सापाशी स्टंट करत होता. हा स्टंट करताना त्याला अनेकांनी रोखले मात्र त्याने कोणाचे ऐकले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयातून संतोषचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदन अहवालासाठी पाठवला आहे.
























































