मालवणात 26 जानेवारीला राष्ट्रीय पतंग महोत्सव : वैभव नाईक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

मालवण शहरातील दांडी समुद्रकिनाऱ्यावर 26 जानेवारीला राष्ट्रीय स्तरावरील पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. सकाळी दहा ते सायंकाळी पाच यावेळेत होणाऱ्या या महोत्सवात राजकोट, सुरत, केरळ, पाचगणी येथील पतंगप्रेमीसह जिल्ह्यातील पतंगप्रेमी सहभागी होणार आहेत. सेलिब्रिटीच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन होईल, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.

मालवण तालुका शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, शहर प्रमुख बाबी जोगी, उपतालुका प्रमुख गणेश कुडाळकर, उपशहर प्रमुख सन्मेश परब, अंजना सामंत, किसन मांजरेकर, श्याम झाड, महेंद्र म्हाडगुत, अक्षय रेवंडकर, अक्षय भोसले यांच्यासह अन्य शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.