अश्लील फोटो बाळगणे हा गुन्हा नाही, केरळ उच्च न्यायालयाचे मत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। कोची

अश्लील फोटो जवळ बाळगणे हा गुन्हा ठरत नाही. इनडिसेंट रिप्रेझेंटेशन ऑफ वुमन (प्रतिबंध) कायद्यांतर्गत तो गुन्हा सिद्ध होत नाही, असे मत केरळ उच्च न्यायालयाने नोंदविले आहे. त्याचबरोबर अश्लील छायाचित्रांचे वितरण व प्रकाशन करणे हा गुन्हा असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. एका पुरुष आणि महिलेविरोधातील खटल्यावर निर्णय देताना न्यायालयाने हे भाष्य केले.

एखाद्या सज्ञान व्यक्तीकडे असलेले अश्लील छायाचित्र ठरावीक उद्देशाने किंवा जाहिरातीसाठी वितरित किंवा प्रकाशित केले गेले तरच कायद्यानुसार तो व्यक्ती शिक्षेस पात्र ठरणार आहे, असे न्यायमूर्ती राजा विजयवर्गीय यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. हे प्रकरण कोल्लम जिल्हा दंडाधिकारी न्यायालयात प्रलंबित होते. कोल्लममध्ये एका तपासात पोलिसांना काही व्यक्तींच्या कॅमेरामध्ये अश्लील फोटो आणि व्हिडीओ सापडले. या प्रकरणावर सोमवारी केरळ उच्च न्यायालयात सुनावणी झाली.