शाहू महाराजांना वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांना वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा असल्याचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबईतील पत्रकार परिषदेत सांगितले.

वंचित बहुजन आघाडी छत्रपती शाहू महाराज यांना लोकसभा निवडणुकीत पूर्ण पाठिंबा देणार आहे. वंचित बहुजन आघाडी फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेवर विश्वास ठेवते आणि या विचारधारेचे प्रमुख समर्थन करते. कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांच्या वंशजांबद्दल आमच्या मनात अपार आदर आहे. त्यामुळे आम्ही हा जाहीर पाठिंबा त्यांना दिल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

शाहू महाराज यांनी मानले आभार

वंचित बहुजन आघाडीने कोल्हापूर मतदारसंघात दिलेल्या पाठिंब्याबद्दल शाहू महाराज यांनी ट्विट करत आभार मानले आहेत. शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणानुबंध जपले गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.