
सामना ऑनलाईन। कोलकाता
मी जेव्हा बिहारला जाते, उत्तर प्रदेशात किंवा पंजाबला जाते तेव्हा तिथली भाषा बोलते. जर तुम्ही बंगालमध्ये येणार असाल तर तुम्हाला बंगाली भाषा आलीच पाहिजे, अशी भूमिका जाहीर करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बांगला अस्मितेचा सुर आळवला.
बंगालमध्ये येऊन राहणाऱया आणि बाईकवरून फिरणाऱयांची गुंडगिरी मी सहन करणार नाही. या ठिकाणी राहणाऱयांना येथील भाषा आली पाहिजे, असेही ममता म्हणाल्या.

























































