
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी महिन्यात घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी संकेतस्थळावर जाहिर झाला. राज्यात कोकण विभाग अव्वल ठरला आहे. कोकण बोर्डाचा निकाल 88.33 टक्के लागला. रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल 87.00 टक्के आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल 91.24 टक्के लागला आहे. रत्नागिरीतील विश्वजीत किरण सामंत याला 99 टक्के गुण मिळाले आहेत. कोकण विभागातून 34 हजार 602 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 30 हजार 581 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. रत्नागिरी जिल्ह्यातून 23 हजार 315 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 20 हजार 283 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 11 हजार 287 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 10 हजार 298 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

























































