कुर्डुवाडीत एकाच वेळी सात मृतदेहांवर अंत्यसंस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आक्रोश, रडारड आणि उपस्थितांच्या गंभीर मुद्रा, एकूणच मन हेलावून टाकणारा प्रसंग आज स्मशानभूमीत पाहायला मिळाला. कुर्डुवाडी शहराच्या इतिहासात एकाच वेळी सातजणांचा अंत्यविधी करण्यात आला. मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत हे सर्व अंत्यविधी बाळाजी कोळेकर यांच्या सहकारी मित्रांनी पीपीई किट घालून उरकले. आज स्मशानही गहिवरले असेल, इतके भीषण चित्र होते.